Ad will apear here
Next
‘राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल’च्या मेळाव्याला चांगला प्रतिसाद


पुणे : ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलने सुशिक्षित वर्गापर्यंत पक्षाचे विचार पोहोचवावेत, आरोग्य क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांना मदतीचा हात द्यावा,’ असे आवाहन पुणे शहर अध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांनी केले.

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलतर्फे ११ जून रोजी टिळक रोडवरील मराठ चेंबर ऑफ कॉमर्स येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर पुणे शहर राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे मावळते अध्यक्ष डॉ. दत्तात्रय गायकवाड, नूतन अध्यक्ष डॉ. सुनील जगताप, राष्ट्रवादी डॉक्टर्स सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सतीश बाबर व्यासपीठावर उपस्थित होते.                     

खासदार चव्हाण म्हणाल्या, ‘डॉक्टर मंडळी सुशिक्षित, प्रगल्भ समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. डॉक्टर सेलमधील डॉक्टर्सना अत्यावश्यक वैद्यकीय सेवेतून वेळ काढून पक्ष कार्य करावे लागते, तरीही उपलब्ध वेळेचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करून डॉक्टरांनी सेलचे उपक्रम सर्व स्तरात पोहोचवावेत. रुग्ण सेवेच्या क्षेत्रातील विविध समस्या सोडविण्यासाठी कार्यरत राहावे.’

डॉ. बाबर म्हणाले, ‘वैद्यकीय व्यवसायासमोर नवनवीन अडचणी उभ्या राहत आहेत. नव्याने या व्यवसायात येतील की नाही, अशी भीती निर्माण होत आहे. या अडचणी समजावून घेऊन त्यावर मार्ग काढला पाहिजे.’

राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल प्रदेशचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांनी पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या. या वेळी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी डॉ. सुनील जगताप यांची निवड करण्यात आली. डॉ. बाबर यांनी नियुक्ती पत्र दिले. कार्याध्यक्षपदी डॉ. राजेश पवार, उपाध्यक्षपदी अजितसिंह पाटील, डॉ. सिद्धार्थ जाधव, तर सरचिटणीसपदावर डॉ. हेमंत तुसे यांची नियुक्ती करण्यात आली. मावळते शहरअध्यक्ष डॉ. दत्तात्रय गायकवाड यांची प्रदेश कार्यकारिणीवर निवड जाहीर करण्यात आली.

या वेळी डॉ. सुनील होनराव, डॉ. दत्ता गायकवाड, डॉ. राजेश पवार, डॉ. सूर्यवंशी, डॉ. सुनील इंगळे, डॉ. गिरीश होनराव, डॉ. घारे, डॉ. नरेंद्र खेनट, डॉ. सुनील पायगुडे, डॉ. अर्जुन चव्हाण, डॉ. लालासाहेब गायकवाड, डॉ. शंतनू जगदाळे, डॉ. सुजाता बरगाळे, डॉ. शिवदीप उंदरे, डॉ. सुनीता काळे, डॉ. राहुल काळभोर, डॉ. राज लवंगे, डॉ. मुस्ताक तांबोळी, डॉ.अनिल लिंगडे, डॉ. भाऊसाहेब सोनावणे, डॉ. सुलक्षणा जगताप, डॉ. प्रदीप उरसळ,  डॉ. रवींद्र काटकर, डॉ. संभाजी करंडे, डॉ. दरक, डॉ. राजेश माने, अशोक राठी, मनाली भिलारे उपस्थित होते.

‘पुण्यामध्ये डॉक्टर्स सेलच्या पुणे शहर कार्यकारिणी व आठ ही विधानसभा मतदारसंघच्या कार्यकारिणीची निवड एक जुलै रोजी करण्यात येणार आहे. नव्या जोमाने डॉक्टर सेलच्या माध्यमातून वैद्यकीय व्यवसायातील प्रश्न सोडवले जातील,’ असे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. जगताप यांनी सांगितले.

डॉ. राहुल सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. राजेंद्र जगताप यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZULBP
Similar Posts
राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या अध्यक्षपदी डॉ. जगताप यांची फेरनिवड पुणे : येथील राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलची बैठक १० जून २०१९ रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सेलच्या अध्यक्षपदी डॉ. सुनील जगताप यांची, तसेच २०१८च्या कार्यकारिणीचीही फेरनियुक्ती करण्यात आली.
पुण्यात ३० जूनला डॉक्टरांचा सन्मान सोहळा पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेल पुणे शहर यांच्या वतीने ‘डॉक्टर्स डे’निमित्त वैद्यकीय क्षेत्रांतील नामवंत डॉक्टरांचा सन्मान सोहळा ३० जून २०१९ रोजी होणार आहे.
‘राष्ट्रवादी काँग्रेसने कलाक्षेत्राच्या समस्या सोडवाव्या’ पुणे : ‘राष्ट्रवादी काँग्रेसने सांस्कृतिक विभागाद्वारे कलाक्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे. कलाकारांवर दडपण न येता त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. त्यांच्या नैसर्गिक कलागुणांना पोषक वातावरण मिळण्यासाठी कार्यरत रहावे’, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राष्ट्रवादी
‘कॉफी टेबल बुक’च्या सहाव्या आवृत्तीचे प्रकाशन पुणे : राज्यसभा सदस्य अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वावरील प्रबोधन माध्यम प्रकाशनची निर्मिती असलेले ‘वंदना चव्हाण : अनरेवेलिंग ट्रू स्टेट्समनशिप’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language